शासकीय दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे -: जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :- १.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला. २.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला. ३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला. ४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला. ५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा. ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा. क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा. (वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.) ६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा. ७.अर्जदार यांचे आधारकार्ड ८.शिधापत्रिका ९.अर्जदार यांचा एक फोटो. -: नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :- १.अर्जदार यांचा जातीचा दाखला २.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला. ३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला. ४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला. ५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा. ६.अर्जदार यांचे आधारकार्ड ७.शिधापत्रिका ८.अर्जदार यांचा एक फोटो. -: डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :- १.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला. ...