शासकीय दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
-: जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
(वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.)
६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८.शिधापत्रिका
९.अर्जदार यांचा एक फोटो.
-: नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा.
६.अर्जदार यांचे आधारकार्ड
७.शिधापत्रिका
८.अर्जदार यांचा एक फोटो.
-: डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.
-: उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.
शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.जमिनधाराचा तलाठी रहिवासी दाखला.
२.खाते उतारा
३.७/१२ उतारा (५ एकर च्या आत)
४.शिधापत्रिका
५.जमिनधारकाचे आधारकार्ड
६.जमिनधारकाचा एक फोटो.
-: EWS प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचा तलाठी रहिवासी दाखला.
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.जातीचा दाखला
५.खाते उतारा, ७/१२ (५ एकर च्या आत.)
६.घराचा ८अ उतारा (1000 स्के.फुट च्या आत.)
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८. शिधापत्रिका
९. अर्जदार यांचा एक फोटो.
-: डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुरावा
६.७/१२,खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७.अर्जदार यांचा एक फोटो.
Comments
Post a Comment